• Download App
    भाजप आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खानला अटक Mumbai Police Crime Branch says it has arrested a person, Osama Shamsher Khan

    भाजप आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खानला अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : भाजपचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खान (वय 48) या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली आहे. पोलिसांच्याच प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.Mumbai Police Crime Branch says it has arrested a person, Osama Shamsher Khan

    आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह ठार करण्याची धमकी देणारा फोन कॉल आला होता. याबाबत त्यांनी ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती तसेच त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील या धमकी संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र लिहिले होते.

    त्यानंतर काही तासांमध्येच मुंबई पोलिसांनी ओसामा समशेर खान या व्यक्तीला आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात वांद्रे येथून अटक केली आहे.

    Mumbai Police Crime Branch says it has arrested a person, Osama Shamsher Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक