जाणून घ्या, मुंबई पारबंदर प्रकल्प नेमकं कसा आहे?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पहिल्या समुद्री पुलाचे मुंबई ते मुख्य भूमी पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील २२ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच, मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. Mumbai Parbandar Project is a game changer that will change the socio economic situation of the third Mumbai
या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा समावेश आहे. तर
या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किलोमीटर, जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किलोमीटर या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील (mainland) शिवाजीनगर व राष्ट्रीय महामार्ग-४ब वर चिर्ले गावाजवळ दिले आहेत. तसेच, मुंबई पारबंदर प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ मधील प्रत्येकी ६५ ते १८० मी. लांबीच्या एकूण ७० गाळ्यांची ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरची उभारणी आहे.
उभारणीचे हे काम वैशिष्ट्यपूर्ण अशा तंत्रज्ञान, उपक्रमांद्वारे तसेच आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात आता पाण्यावरील हा पूल आता जमिनीशी जोडला गेला आहे.
अनुषंगिक सोयी, सुविधा, रस्ते व वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना, वेगवेगळ्या तांत्रिक बाबींची पुर्तता, माहिती फलक, सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर हा पारबंदर प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
Mumbai Parbandar Project is a game changer that will change the socio economic situation of the third Mumbai
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!