मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता.Mumbai Municipal Corporation employees will get a bonus of Rs 16,000 on the occasion of Diwali
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस दिला जातो. गेले दीड वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता चांगले काम केले.त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे.
त्यामुळे बोनसच्या रक्कमेत पाचशे रुपयांची वाढ करत १६ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. याबाबतची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर आज करणार असल्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना यंदा १६ हजार रुपये बोनस मिळणार असे ही बोलले जात आहे.
दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळी बोनसची घोषणा न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती . मात्र महापौर किशोरी पेडणेकर या बुधवारी ( आज) मुख्यमंत्र्यांसोबत पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत चर्चा करतील आणि त्यानंतर त्या घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे १ लाख पालिका कर्मचाऱ्याना दिवाळी बोनस मिळणार आहे.
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता. यावर्षी परिस्थिती सुधारली असल्याने बोनसची रक्कम वाढवण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मागील वर्षापेक्षा ५०० रुपयांची वाढ करून १६ हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. याची घोषणा मुंबईच्या महापौर बुधवारी ( आज ) करणार असल्याचे समजते.
Mumbai Municipal Corporation employees will get a bonus of Rs 16000 on the occasion of Diwali
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसला विजयी करा – नितीन बानगुडे पाटील
- पुण्यात दिवाळीसाठी नियमावली जाहीर , फटाके विक्रीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक
- लाइव्ह टीव्हीवर शोएब अख्तरचा घोर अपमान, पाकिस्तानी टीव्ही अँकर संतापला, शो सोडण्यास सांगितले
- जम्मू-काश्मिरात टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे जमात-ए-इस्लामीच्या अनेक ठिकाणांवर छापे