याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी, मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2-अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (9.77 किमी)’ सेवेचा शुभारंभ केला. याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 (आरे जेव्हीएलआर ते बीकेसी – 12.69 किमी)’ या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्कचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मेट्रो 3 ही देशातील सर्वात लांब, सिंगल आणि भूमिगत मेट्रो लाईन असून हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल आहे.
या प्रकल्पाची सुरुवात 2017 मध्ये झाली असून, हे काम अत्यंत जलद गतीने अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मेट्रोचा शेवटचा टप्पा ‘आचार्य अत्रे चौक ते कफ परेड’ येत्या ऑगस्ट महिन्यात जनतेसाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच आत्तापर्यंत सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गिकेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर एकूण 26 स्टेशन उभारली गेली आहेत, ज्यात प्रत्येक स्टेशनला अनेक एंट्रीमार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेषतः मेट्रो 3 एअरपोर्टशी जोडली जाईल, ज्यामुळे नागरिकांना मेट्रोनेच एअरपोर्टपर्यंत पोहोचता येईल.
मुंबईतील इतर मेट्रो मार्गांचे कामही वेगाने सुरू आहे. यावर्षी आणि पुढील वर्षी 50 किमी मेट्रो मार्गांचा विस्तार करून मुंबई महानगर प्रदेश (MMR) सार्वजनिक वाहतुकीद्वारे अधिक प्रभावीपणे जोडला जाईल. लवकरच मुंबईकरांना एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, लोकल आणि बसने प्रवास करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
Mumbai Metro Route 3 Phase 2 service launched Fadnavis gives green signal
महत्वाच्या बातम्या
- भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले
- Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप
- सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण