विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांना मेट्रो 2 ते आणि मेट्रो 7 या दोन नवीन मार्गिका मिळाल्या. मेट्रो सुरू झाल्या. पण उद्घाटनाच्या कार्यक्रमात मात्र भाषणे गाजली ती कौरव – धृतराष्ट्र – चुलीत घालायचे श्रेय या शब्दांनी गाजली.Mumbai Metro: Kaurav – Dhritarashtra – Credit for the inauguration of the Metro
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टोल्यांवर प्रतिटोले हाणले.
मेट्रोच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या, पण मुंबईच्या सगळ्या मेट्रो सुरू करा. कारशेड बांधा, असे खोचक उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी काढले होते. फडणवीस यांच्या या खोचक उदार यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
श्रेयवाद घाला चुलीत. आम्हाला मुंबईकरांना सुविधा द्यायच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना नितीन गडकर यांनी मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले. पण नंतर काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता आली आणि काही पूलांची उद्घाटने विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना केली. त्यावेळी ते म्हणाले होते की पूल जरी युती सरकारने बांधले असले तरी उद्घाटने मी करतो आहे. शेवटी दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम!!, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कौरवांचे चाळे बघू न शकणारा धृतराष्ट्राचा महाराष्ट्र नाही. सगळ्या जनतेला कोण काय करते हे दिसत असते. जनता उघड्या डोळ्याने पाहत असते. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत म्हणूनच महाविकास आघाडी असे नाव आघाडीला ठेवले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर प्रति मटोला लगावला. उद्घाटन मेट्रोचे होते, पण भाषणांमधून धृतराष्ट्र – कौरव – चुलीत घाला श्रेय या शब्दांच्या फुलबाजा उडल्या…!!
Mumbai Metro: Kaurav – Dhritarashtra – Credit for the inauguration of the Metro
महत्त्वाच्या बातम्या
- शेतीला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल -हर्षवर्धन पाटील
- ED Action : …मग आमच्या मागे ईडी का लागत नाही?; प्रकाश आंबेडकरांचा शिवसेना – राष्ट्रवादीला टोला
- पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
- गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव उघडकीस -कात्रज परिसरातील खूनाचा प्रकार पाेलीसांकडून उघड