• Download App
    मोठी बातमी : 15 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई लोकल, दोन डोस घेतलेल्यांना मिळेल प्रवासाची परवानगी । Mumbai Local Train To Start From 15th August For Those Who Took 2 Doses Of Vaccine Says CM Uddhav Thackeray

    मोठी बातमी : 15 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई लोकल, दोन डोस घेतलेल्यांना मिळेल प्रवासाची परवानगी

    Mumbai Local Train To Start From 15th August : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्याची मागणी होत होती ती मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा येत्या 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. Mumbai Local Train To Start From 15th August For Those Who Took 2 Doses Of Vaccine Says CM Uddhav Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्याची मागणी होत होती ती मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा येत्या 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

    रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी साधलेल्या ऑनलाइन संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सेवेबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, 15 ऑगस्टची तारीख यासाठीच की, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत, त्यांना सर्वप्रथम प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. अशा दोन डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी एक अॅप आज उद्यामध्ये कार्यान्वित होईल. त्या अॅपवर संबंधित प्रवाशाने आपली लस घेतल्याचा कोड टाकायचा आहे. यानंतर त्यांना पास उपलब्ध होईल. शिवाय ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांनाही मुंबई महापालिकेच्या कार्यालयांतून ऑफलाइन पद्धतीने पास देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

    मुंबई लोकलबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

    Mumbai Local Train To Start From 15th August For Those Who Took 2 Doses Of Vaccine Says CM Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य