Mumbai landslide : पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. Mumbai landslide in chembur vashi naka many houses affected 11 dead bodies recovered so far
वृत्तसंस्था
मुंबई : पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मुसळधार पावसात चेंबूरमधील वाशीनाका परिसरात असलेल्या भारतनगर बीएआरसी संरक्षक भिंत कोसळली. शेजारी असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळून 14 जण ठार झाले आहेत. तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत 14 जणांचा हकनाक बळी गेला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले असून मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
या दुर्घटनेत अद्याप 6 ते 8 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी वेगाने मदत कार्य सुरू आहे. तथापि, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
Mumbai landslide in chembur vashi naka many houses affected 11 dead bodies recovered so far
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा
- भविष्यात देशातील १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालणार, पियुष गोयल यांनी सांगितली केंद्र सरकारची योजना
- कापड उद्योगात भारताचा चीनला धक्का, कोरोना काळात अमेरिकेतील निर्यात वाढली
- टी सिरीजचे भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप खंडणीसाठी, मॉडेलसह स्थानिक नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल
- आयत्या बिळावर नागोबा, पैैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी उध्दव ठाकरेंची, अतुल भातखळकर यांचा आरोप