• Download App
    Mumbai High Court  HC Directs Police to Submit Security Audit of Courts & Judges' Residences न्यायालये, न्यायमूर्तींच्या निवासस्थानांचे सुरक्षा ऑडिट सादर करा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश, न्यायमूर्तींच्या सुरक्षेप्रकरणी सुमोटो याचिका

    Mumbai High Court  : न्यायालये, न्यायमूर्तींच्या निवासस्थानांचे सुरक्षा ऑडिट सादर करा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश, न्यायमूर्तींच्या सुरक्षेप्रकरणी सुमोटो याचिका

    Mumbai High Court 

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mumbai High Court  उच्च न्यायालयाच्या इमारती, राज्यभरातील न्यायमूर्तींची निवासस्थाने आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या सुरक्षा ऑडिटचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस विभागाला दिले आहेत. १७ फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी हा तपशील द्यावा लागणार आहे.Mumbai High Court

    मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नुकतेच हा आदेश दिला. न्यायालयीन अधिकारी व कायदेशीर क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करत हे आदेश दिले.Mumbai High Court



    देशभरातील न्यायालयीन सुरक्षेची दखल

    झारखंडमध्ये २८ जुलै २०२१ रोजी धनबादचे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती उत्तम आनंद मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्या वेळी एका रिक्षाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर ही हत्या असल्याचे उघड झाले. त्यानंतर देशभरातील न्यायालयीन अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या धमक्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. ‘न्यायमूर्ती आणि वकिलांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

    Mumbai High Court  HC Directs Police to Submit Security Audit of Courts & Judges’ Residences

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांची नरेश अरोरांच्या बंधूंशी पुण्यात चर्चा!!, रोहित पवारांच्या narrative वर फेरले पाणी!!

    Sunil Tatkare : राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरे म्हणाले, प्रस्ताव आल्यास चर्चा करू; शशिकांत शिंदे यांच्या लेखातील दाव्यांवर नोंदवला आक्षेप

    Malegaon : मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो; शिवसेनेचे आंदोलन, फोटो आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे