• Download App
    WATCH : पाहता-पाहता जमिनीत गडप झाली अख्खी कार, मुंबईतील पावसानंतर व्हिडिओ झाला व्हायरल । mumbai heavy rains car sank into ground video viral on social media car parked in ghatkopar society is sinking

    WATCH : पाहता-पाहता जमिनीत गडप झाली अख्खी कार, मुंबईतील पावसानंतर व्हिडिओ झाला व्हायरल

    car sank into ground video : पावसाळा सुरू होताच मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. 9 जूनपासून मुंबई व आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगडसह अनेक भागांसाठी 13 जूनपर्यंत (रविवार) अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी इमारत कोसळल्या आणि काही ठिकाणी रस्ते पाण्यात बुडून गेले. दरम्यान, घाटकोपर भागात पार्किंगमध्ये पार्क केलेली कार जमिनीत गडप झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. heavy rains car sank into ground video viral on social media car parked in ghatkopar society is sinking


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पावसाळा सुरू होताच मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. 9 जूनपासून मुंबई व आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगडसह अनेक भागांसाठी 13 जूनपर्यंत (रविवार) अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी इमारत कोसळल्या आणि काही ठिकाणी रस्ते पाण्यात बुडून गेले. दरम्यान, घाटकोपर भागात पार्किंगमध्ये पार्क केलेली कार जमिनीत गडप झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    पाऊस पडल्यानंतर कार जमिनीत धसल्याच्या संदर्भात बीएमसीने निवेदन जारी केले आहे. या कार अपघाताशी पालिकेचा काही संबंध नाही, असे बीएमसीने सांगितले. ही घटना घाटकोपर परिसरातील खासगी सोसायटीची आहे.

    महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती बीएमसीने आपल्या निवेदनात दिली आहे. त्यानुसार घाटकोपर पश्चिमेतील एका खासगी सोसायटीजवळ उभी असलेली कार जमिनीत धसत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 13 जून 2021 रोजी सकाळची आहे.

    या सोसायटीच्या आवारात एक विहीर असल्याचे सांगण्यात आले. अर्धी विहीर सिमेंट प्लास्टरने झाकलेली होती. त्यानंतर सोसायटीच्या लोकांनी या भागात आपली वाहने उभी करण्यास सुरुवात केली. पण त्यादरम्यान, जोरदार पाऊस पडल्यानंतर येथे पार्क केलेली कार पूर्णपणे पाण्यात होत्या, नंतर जमीन भुसभुशीत होऊन ती त्यातच गडप झाली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नव्हते.

    heavy rains car sank into ground video viral on social media car parked in ghatkopar society is sinking

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!