विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’ची घोषणा व लोगोचे अनावरण केले. त्याचबरोबर इंडियन मेरीटाईम वीक अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील आज मुंबई दौरा होत असून त्यांच्या या दौऱ्यात दोन लाख वीस हजार कोटी रुपयांच्या समुद्री प्रकल्पांची सुरुवात होणार आहे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये दुपारी 4.00 वाजता हा भव्य कार्यक्रम होणार आहे.Mumbai Climate Week to brainstorm on global climate change; Prime Minister Narendra Modi to visit Mumbai today for Indian Maritime Week
वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी ‘मुंबई क्लायमेट वीक’ 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’, मुंबई येथे होत आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे.
‘मुंबई क्लायमेट वीक’चा भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील. तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्ते ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या परिषदेत ग्लोबल साऊथमधील 30 पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे. ग्लोबल साऊथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे ‘मुंबई क्लायमेट वीक’ हे मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Mumbai Climate Week to brainstorm on global climate change; Prime Minister Narendra Modi to visit Mumbai today for Indian Maritime Week
महत्वाच्या बातम्या
- Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा
- Trump : ट्रम्प किम जोंग उन यांना भेटण्याची शक्यता, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचे बैठकीच्या आयोजनाचे प्रयत्न
- Kangana Ranaut : कंगना यांनी भटिंडा कोर्टात मागितली माफी, म्हणाल्या- गैरसमज झाला, माझा तसा हेतू नव्हता
- लावणी ते चपटी; “पवार संस्कारित” राष्ट्रवाद्यांनी केली महाराष्ट्रात सांस्कृतिक राजकीय “क्रांती”!!