वृत्तसंस्था
लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, तो देखील पाकिस्तान मध्ये जाऊन!!Mumbai Attack Accused Free in Pakistan; Javed Akhtar went to Lahore and showed a mirror to Pakistani rulers
पाकिस्तान मध्ये लाहोर शहरात फैज अहमद फैज लिटरेचर फेस्टिवल साठी जावेद अख्तर आले आहेत. येथे एका मुलाखती दरम्यान त्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना परखड शब्दांत सुनावले आहे. आम्ही मुंबईकर आहोत.
त्यामुळे मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे आम्हाला दुःख आहे आणि मुंबईवर हल्ला करणारे हल्लेखोर तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत. भारतीयांनी जर ही वेदना व्यक्त केली तर तुम्हाला वाईट वाटायला नको, अशा शब्दांमध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे.
जावेद अख्तर आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात कोर्टात संघर्ष सुरू आहे. तरी देखील कंगनाने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या राज्यकर्त्यांना परखड बोल सुनावल्याने त्यांचे कौतुक केले आहे. “घरमे घुसके मारा”, अशा शब्दांत कंगनाने जावेद अख्तर यांच्या कृतीची स्तुती केली आहे.
Mumbai Attack Accused Free in Pakistan; Javed Akhtar went to Lahore and showed a mirror to Pakistani rulers
महत्वाच्या बातम्या
- विधिमंडळातील “व्हीप हत्यारा”चा संयमित वापर; उद्धव गटाला सहानुभूती मिळू न देण्याची शिंदे शिवसेनेची खेळी
- सुरक्षेचे विषय गंभीर, ते गंभीरच ठेवावेत पण संजय राऊतांचे आरोप बिनडोकपणाचे; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- चिनी सीमेवर भारतीय सैन्य राहुलजींनी पाठवले का??, ते तर मोदींनी पाठवले; जयशंकरांचा काँग्रेसला टोला
- शिंदे गटाच्या अवैधतेवर कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; पण शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुकांच्या हालचाली