Mumbai Alert : देशाची आर्थिक राजधानी मुंबई दहशतवाद्यांच्या कायम हिटलिस्टवर राहिलेली आहे. या कारणास्तव कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष न करता काळजी घेतली जाते आणि सुरक्षा वाढविली जाते. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने उद्या म्हणजेच 31 डिसेंबरच्या पोलिसांच्या सर्व सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत तैनात असलेले सर्व पोलीस उद्या ड्यूटीवर हजर राहणार आहेत. Mumbai Alert fear of terror attack on Mumbai, cancellation of all police holidays
वृत्तसंस्था
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई दहशतवाद्यांच्या कायम हिटलिस्टवर राहिलेली आहे. या कारणास्तव कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष न करता काळजी घेतली जाते आणि सुरक्षा वाढविली जाते. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने उद्या म्हणजेच 31 डिसेंबरच्या पोलिसांच्या सर्व सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत तैनात असलेले सर्व पोलीस उद्या ड्यूटीवर हजर राहणार आहेत.
मुंबईत खलिस्तानी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासोबतच एजन्सींना एका संशयिताची माहिती मिळाली, त्यानंतर मुंबईला अलर्टवर ठेवण्यात आले आणि सर्व पोलिसांनी आपापल्या स्तरावर त्या संशयिताचा शोध सुरू केला, नंतर संशयित परदेशात पकडला गेल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था
मुंबईतील गजबजलेल्या भागात हे दहशतवादी काही अनुचित घटना घडवू शकतात, असा अलर्ट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, मुंबई पोलीस अजूनही सतर्क असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळेच 31 डिसेंबरला मुंबईत अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या एटीसी, दंगेविरोधी पथक, बीडीडीएस, गुन्हे शाखा यांनाही सतर्क करण्यात आले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कोणत्याही मोठ्या पार्ट्या, कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, जर कोणी कोरोनाचे नियम पाळत नसेल आणि अशा प्रकारची पार्टी आयोजित करत असेल, ज्यामुळे कम्युनिटी स्प्रेडची शक्यता असेल, तर अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबईत सात जानेवारीपर्यंत कलम 144ही लागू करण्यात आले आहे.
Mumbai Alert fear of terror attack on Mumbai, cancellation of all police holidays
महत्त्वाच्या बातम्या
- Kanpur IT Raid : अत्तर व्यापारी पीयुष जैनने जप्त केलेला खजिना कोर्टाला परत मागितला, कराचे आणि दंडाचे 52 कोटी वजा करा पण बाकीचे परत द्या!
- अब्रूनुकसानीचा खटला : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक कोर्टात गैरहजर, भाजप नेत्याचा 100 कोटींचा मानहानीचा खटला
- सिंधुदुर्ग पोलिसांनीच कायदा पाळला नाही, 65 वर्षांवरील व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीला बोलावताच येत नाही, फडणवीस आक्रमक
- विनामास्क कोणीही घराबाहेर पडता कामा नये ; किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदीचे केले नियोजन