• Download App
    एनसीबी ऑफिसर सांगून अभिनेत्रीला केले ब्लॅकमेल! अभिनेत्रीची आत्महत्या, नवाब मालिकांचे एनसीबीवर टीकास्त्र | Mumbai actress was blackmailed by fake NCB officer, Actress commits suicide, Nawab malik trolls NCB

    एनसीबी ऑफिसर सांगून अभिनेत्रीला केले ब्लॅकमेल! अभिनेत्रीची आत्महत्या, नवाब मालिकांचे एनसीबीवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : 28 वर्षीय एका अभिनेत्रीने मुंबईत 23 डिसेंबर रोजी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण अतिशय विचित्र आहे. दोन लोकांनी तिला आम्ही एनसीबीचे ऑफिसर आहोत असे सांगून तिच्याकडे 40 लाखांची मागणी केली होती. त्या नंतर याच दोघानी तिच्याकडून 20 लाखांची मागणी केली.

    Mumbai actress was blackmailed by fake NCB officer, Actress commits suicide, Nawab malik trolls NCB

    ही अभिनेत्री 20 डिसेंम्बर रोजी हुक्का पार्लरमध्ये गेली होती. अभिनेत्री आपल्या दोन मित्रांसोबत हुक्का पार्लरमध्ये गेली होती. या दोन मित्रांचा देखील संबंधित दोषी व्यक्तींसोबत संबंध असू शकतो असे पोलिसांनी सांगितले आहे.

    दोषी व्यक्तींनी अभिनेत्री सोबत संपर्क साधला आणि तुम्हाला ड्रग प्रकरणामध्ये अडकवू असे देखील सांगितले होते. या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केलेली आहे. पाेलिसांनी सेक्शन 360, 170, 420, 383, 388, 389, 506 आणि 120ब अंतर्गत या दोघांवर केस दाखल केली आहे.


    MPSC Student Suicide : पुन्हा एक आत्म’हत्या’…. ? ‘सॉरी! काहीही सकारात्मक चित्र दिसत नाहीये’… MPSC च्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य


    या घटनेनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी वर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. नेते नवाब मलिक यांचे म्हणणे असे आहे की, एनसीबीची स्वतःची एक प्रायव्हेट आर्मी आहे. जे बॉलिवूड तसेच बड्या लोकांकडुन पैसे उकळण्याचे काम करतात.

    नवाब मलिक म्हणतात, एनसीबीचे स्वतःचे एक extortion रॅकेट मुंबईमध्ये चालूच असते आणि या सर्वामागे एनसीबी आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. याआधी देखील गोसावी आणि भानुशाली या दोघांना आपण एक्सपोज केलेच होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

    Mumbai actress was blackmailed by fake NCB officer, Actress commits suicide, Nawab malik trolls NCB

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा

    Eknath Shinde : आगामी निवडणुका महायुतीत लढण्याची भूमिका ठेवा; शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत, एकनाथ शिंदेंचे आपल्या मंत्र्यांना आदेश