महाविजय २०२४’ या या साठीचीं तयारी सुरु
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. Mulrlidhar mohol BJP mission mahavijay 2024.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे महत्वाकांक्षी अभियान असलेल्या ‘महाविजय २०२४’ साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत त्या अंतर्गत येणाऱ्या कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे ‘महाविजय २०२४’चे समन्वयकपद म्हणूनही मोहोळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणूनही मोहोळ हेच काम पाहणार आहेत.
Mulrlidhar mohol BJP mission mahavijay 2024.
महत्वाच्या बातम्या
- हे काय करून बसलास मित्रा? नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची भावुक पोस्ट
- लवासा लेक सिटीत डार्विन ग्रुप उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिभव्य पुतळा!!
- ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ स्थानके विकसित केली जाणार
- Haryana Violence : नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या या भागात निर्बंध