• Download App
    मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा एकमेकांशी संबंध"Mukta Dabholkar says The connection between Dabholkar, Pansare, Kalburgi, Gauri Lankesh murder and Nalasopara blast case"

    मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा एकमेकांशी संबंध

    मुक्ता दाभोलकर म्हणाल्या , “दाभोलकरांच्या खुनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खुनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत.”Mukta Dabholkar says The connection between Dabholkar, Pansare, Kalburgi, Gauri Lankesh murder and Nalasopara blast case”


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे पूर्ण झाली तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पकडून त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी दाभोलकर यांची दोन्ही मुले म्हणजेच कन्या मुक्ता दाभोलकर आणि सुपुत्र हमीद दाभोलकर यांनी केली आहे. त्यांनी खटल्यातील दिरंगाईवर नाराजीदेखील व्यक्त केली. खटला सुरू न झाल्यानं आरोपी जामिनावर सुटत असल्याचंही मत त्यांनी नोंदवलं आहे.

    खटल्याला उशीर का?

    मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी पकडले गेले आहेत. परंतु अद्याप खटला सुरू झालेला नाही. खटला सुरू होण्यास उशीर झाला तर त्याचा फायदा आरोपींना मिळून ते जामिनावर सुटतात. या खटल्यातील आरोपी विक्रम भावे अशाप्रकारे जामिनावर सुटलेले आहेत. आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलो आहोत. 8 वर्षांनंतर तरी हा खटला ताबडतोब सुरू होणं गरजेचं आहे.”



    सर्व खुनांचा परस्परांशी संबंध

    पुढे त्या म्हणाल्या की, “दाभोलकरांच्या खुनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खुनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तसेच या पाचही प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. या प्रकरणात केवळ काही तरुण आरोपी पकडले जाणं पुरेसं नाही. त्यांना पैसे पुरवणारं कोण आहे? हा मोठा कट तयार करणारे कोण आहेत? एकूणच या संपूर्ण कटाचे सूत्रधार कोण आहेत? हे समोर येणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी हा व्यापक कटाचा भाग असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. म्हणूनच या कटाच्या मुळांशी पोहोचणं गरजेचं आहे.”

    “सूत्रधारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावं”

    मुक्त दाभोलकर म्हणाल्या की, “लवकरात लवकर खटला सुरू व्हावा. लवकरात लवकर खुनाच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचावं, अशी आमची मागणी आहे. अशाप्रकारची विचारसरणी बाहेर राहिल्याने अनेक विवेकवादी लोकांच्या जीविताला धोका आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, ते काम पुढेही सुरूच ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

    “Mukta Dabholkar says The connection between Dabholkar, Pansare, Kalburgi, Gauri Lankesh murder and Nalasopara blast case”

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा