वृत्तसंस्था
मुंबई : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या 56 वर्षीय विष्णू विभू भौमिकला पोलिसांनी पकडले आहे. डीसीपी नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांपर्यंत पोहोचलेला व्यक्ती हा व्यवसायाने ज्वेलर्स असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल करताना त्याने आपले नाव अफजल सांगितले होते.Mukesh Ambani was threatened by Vishnu as ‘Afzal’, revealed after arrest
9 वेळा धमकीचे फोन आले
रिपोर्टनुसार, हा व्यक्ती दहिसरचा रहिवासी आहे आणि त्याने सोमवारी सकाळी 10.39 ते दुपारी 12 वाजेदरम्यान एक-दोन नव्हे, तर नऊ वेळा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोन केला. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
- मुकेश अंबानींच्या कुटुंबाला धमकीचे 8 फोन, 3 तासांत सगळ्यांना संपविण्याची धमकी!!; सगळीकडे हाय अलर्ट!!
केंद्रीय यंत्रणाही सतर्क
मुंबईतील गिरगाव परिसरातील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात सकाळी १०.३९ च्या सुमारास पहिला कॉल करताना त्या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी कलम ५०६ (२) अन्वये फौजदारी धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय यंत्रणांनीही यासंदर्भात माहिती घेतली आहे.
डीएम मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी सुरू
डीसीपी नीलोत्पल यांच्या वतीने आरोपीच्या कोठडीबाबत सांगण्यात आले की, विष्णू विभू भौमिकला बोरिवली पश्चिम येथून पकडून डीएम मार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आम्ही या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्डदेखील तपासत आहोत. ते म्हणाले की, धमक्या देताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींचेच नाव घेतले नाही, तर एकदा कॉलमध्ये धीरूभाई अंबानींचे नावही वापरले होते.
गतवर्षीही धमकी
याआधी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देखील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर एक संशयास्पद एसयूव्ही कार सापडली होती, ज्यामध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. संशयास्पद कार सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसशिवाय एनआयएनेही या प्रकरणात तपास केला.
Mukesh Ambani was threatened by Vishnu as ‘Afzal’, revealed after arrest
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार, पण ही 8 आव्हाने समोर; वाचा सविस्तर…
- FIFA Suspends AIFF : जागतिक फुटबॉल महासंघाने भारतीय महासंघाला केले निलंबित; नियमभंगाचा ठपका; प्रफुल्ल पटेल होते अध्यक्ष!!
- कर्नाटकात शिवमोग्गात सावरकर विरुद्ध टिपू सुलतान समर्थक भिडले; कलम 144 लागू!!
- विनायक मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पत्नी डॉ. ज्योती मेटेंनी अपघाताच्या चौकशीची मागणी