• Download App
    म्युकर मायकोसिस :अहमदनगरमध्ये तब्बल ६१ जणांना संसर्ग;राज्य सरकारची मोफत उपचाराची घोषणा मात्र औषधांसाठीही नातेवाईकांची वणवण। Mucor Mycosis Patients increasing in Ahmednagar shortage of medicine

    म्युकर मायकोसिस :अहमदनगरमध्ये तब्बल ६१ जणांना संसर्ग;राज्य सरकारची मोफत उपचाराची घोषणा मात्र औषधांसाठीही नातेवाईकांची वणवण

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातही आता म्युकर मायकोसिसचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ६१ म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आलंय. या सर्वांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.यावर मोफत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केले होते .मात्र, या आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचाच जिल्ह्यात तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. Mucor Mycosis Patients increasing in Ahmednagar shortage of medicine

    अहमदनगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे म्हणाले, “अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ७८ डीसीएससी आहेत. या केंद्रांमधून आम्ही म्युकर मायकोसिसची माहिती घेतली. त्यात शहरात एकूण ६१ रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून आल्याचं समोर आलंय. यात शहरी भागात किती आणि ग्रामिण भागात किती ही माहिती गोळा करण्याचं काम सुरु आहे. मात्र, सद्यस्थितीत अहमदनगर शहरात एकूण ६१ रुग्ण दाखल आहेत.”

    म्युकर मायकोसिसच्या औषधांचा तुटवडा

    म्युकरमायकोसिससाठी अँम्पिटोरिसम वीम अशी काही अँटिफंगल इंजेक्शन आहेत. त्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आपल्याकडे शहरात तर हे औषध मिळालेलं नाही. आम्हालाही या औषधाच्या मागणीसाठी काही फोन आले. यानंतर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे याबाबत मागणी केलीय.अद्याप या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची कोणतीही माहिती आलेली नसल्याचं पालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितलं.

    Mucor Mycosis Patients increasing in Ahmednagar shortage of medicine

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ