प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितराणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याच्या समजुतीतून हा संप पुकारण्यात आला आहे. MSEB employees strike; There is a possibility of power failure in Maharashtra
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समिती यांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये राज्य सरकारी महानिर्मीती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिका-यांचा समावेश आहे. कर्मचा-यांशी संबंधित 24 संघटना या समितीत आहेत. ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ नेही या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.
महावितरणकडून टोल फ्री नंबर जारी
वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडळ व मंडळ कार्यालयांच्या ठिकाणी 24 तास संनियंत्रण कक्ष
कामे न करणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरोधात कडक कारवाई
वीज गेल्यास ग्राहकांसाठी टोल फ्री, क्रमांक 1800-212-3435/ 1800-233-3435/1912/19120
ठाणे मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 9930269398, वाशी मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 9920491386 ( नियंत्रण कक्ष) व 8879935501/ 9930025104, पेण मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 7875765510.
MSEB employees strike; There is a possibility of power failure in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; राष्ट्रवादी – काँग्रेसचा राजकीय वर्तन व्यवहार, ठाकरेंच्या शिवसेनेसह आघाडीचा कडेलोट अपरिहार्य
- आमदार मुक्ताताई टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप; दोन भाजप आमदारांच्या कर्तव्यनिष्ठेचा वस्तूपाठ
- प्रियांका गांधींचे बिघडले बोल; सगळ्या नेत्यांना अदानी – अंबानींनी खरीदले, पण राहुलला खरीदू नाही शकले!!