• Download App
    Tweet-Tweet : देखें अबके किसका नंबर आता है ! मिसेस फडणवीसांचं सूचक ट्विट Mrs. Amruta fadnavis viral new tweet

    Tweet-Tweet : देखें अबके किसका नंबर आता है ! मिसेस फडणवीसांचं सूचक ट्विट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राजकीय शेरेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिसेस फडणवीसांच्या नवीन ट्विटवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे .अमृता यांनी सोमवारी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले.मात्र त्या ट्विटचा राजकीय अर्थ देखील काढला जातोय . Mrs. Amruta fadnavis viral new tweet

    ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

    काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्विट अमृता यांनी केले होते.

    Mrs. Amruta fadnavis viral new tweet

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल