• Download App
    MPSC एमपीएससीचा मोठा निर्णय… संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; जाहीर केली नवी तारीख

    एमपीएससीचा मोठा निर्णय… संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; जाहीर केली नवी तारीख

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही परीक्षा २८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होते. मात्र, राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला आहे. आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    ‘एमपीएससी’ने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच, राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. याचा सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि मराठवाडा सारख्या काही भागांना चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र रविवारी (ता. 28) 36 जिल्हा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात झालेला अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तर काही भागातील लोकांना स्थलांतर देखील करावे लागले आहे. अशा परिस्थितीत या भागातील विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती.

    MPSC’s big decision… Joint preliminary exam postponed; new date announced

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    विरोधकांचा कारभारच उफराटा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर सगळ्यांचा ओला दुष्काळी दौरा!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 2458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

    Jayant Patil : जयंत पाटलांची मागणी- राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला; अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती नाही