विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब-२०२० ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली होती. ही परीक्षा येत्या ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. MPSC exam will held on 4 sept.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेचे आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणारे पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटससाठी आयोगाच्या वेबसाइटवर माहिती देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० ही परीक्षा आधी ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ९ एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.
MPSC exam will held on 4 sept.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिक पदकविजेत्या लोव्हलिनाला आसाम सरकार देणार अनोखी भेट, घराकडे जाण्यासाठी मिळणार पक्का रस्ता
- प्रियंका गांधी- वड्राच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, कॉँग्रेस स्वबळावरच सर्व जागा लढविणार
- राज्यातील वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचले, निती आयोगाचा अहवाल
- कडक सॅल्यूट ; दहावीमध्ये पाच विषयांत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या कुमार विश्वास सिंहला जायचेय लष्करात
- कोरोना बॅचला फटका बसण्यास सुरूवात, एचडीएफसी बँकेने चक्क जाहिरातीत म्हटले की कोरोना काळातील उत्तीर्णांनी अर्ज करू नयेत