• Download App
    भाजपला – केंद्राला टोचणारे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना उदयनराजेंनी फटकारले; हिंमत असेल, तर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे|MP Udayan raje and MP Sambhaji raje targets journalists over bjp and central govt centric questions

    भाजपला – केंद्राला टोचणारे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना उदयनराजेंनी फटकारले; हिंमत असेल, तर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे

    प्रतिनिधी

    पुणे : खासदार छत्रपती उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीनंतर भाजप आणि केंद्र यांच्या दिशेने टोचणारे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना उदयनराजे यांनी चांगलेच फटकारले.MP Udayan raje and MP Sambhaji raje targets journalists over bjp and central govt centric questions

    तुम्ही नीट प्रश्न विचारा… यात पक्षबिक्ष काही आणू नका. राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी आधी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठा आरक्षणावर चर्चा करावी. मग मी केंद्राचे बघतो,



    अशा शब्दांत उदयनराजे यांनी पत्रकारांना फटकारले. राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारच्या भूमिकेविषयी प्रश्न न विचारता पत्रकारांनी आपल्या प्रश्नांचा रोख केंद्र सरकार आणि भाजपच्या दिशेने ठेवला. त्यावर उदयनराजेंनी पत्रकारांना तुम्ही नीट प्रश्न विचारा. उध्दव ठाकरे असो नाही तर अजित पवार असो. त्यांची जबाबदारी आहे.

    ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे. सभागृहात स्पष्ट भूमिका मांडावी. ते सभागृहात एक बोलतात आणि बाहेर दुसरे बोलतात. त्यांची हिंमत असेल तर अधिवेशन घ्यावे. सगळे सांगावे. त्याचे लाइव्ह टेलिकास्ट करावे. कोणी कोणाला फूस लावली? कोण काय बोलले हे सगळ्यांना कळू द्यात ना… त्यांच्यात दम नाही. एक वर्ष – दीड वर्ष नुसती टोलवा टोलवी चालली आहे. मग केंद्राचे बघता येईल, असे उदयनराजेंनी सुनावले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार संभाजीराजे यांना वेळ दिली नाही का या प्रश्नाचे उत्तर देताना संभाजीराजेंनी मोदींनी वेळ दिली नाही, असे तुम्ही इंटरप्रिट करता आहात. पण मी आतापर्यंत वेळ मागितली आणि त्यांनी दिली नाही, असे कधी घडलेले नाही.

    एक – दोन दिवसांमध्ये मोदींनी मला भेटीची वेळ दिलेली आहे. पण समाजासाठी वेळ मागितल्यावर त्यांनी दिलेली नाही किंवा काही कोविडचे कारण असेल. पत्रकारांनी काही वेगळा अर्थ काढू नये, असे संभाजीराजे म्हणाले.

    MP Udayan raje and MP Sambhaji raje targets journalists over bjp and central govt centric questions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य