• Download App
    खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण। MP Sujay Vikhe infected with corona

    खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण

    आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. MP Sujay Vikhe infected with corona


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता राज्यातील काही बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.दोन दिवसापूर्वी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.दरम्यान आज त्यांचे सुपुत्र खा.सुजय विखे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.



    आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट मध्ये खा.विखे यांनी म्हंटले आहे की , “काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगिकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.”

    MP Sujay Vikhe infected with corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !