प्रतिनिधी
कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारने काही मागण्या केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतली. त्यावरून त्यांच्यावर मॅनेज झाल्याची टीका झाली. या टीकेमुळे संभाजीराजे चिडले असून त्यांनी ‘मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन’ असा सवाल टीकाकारांना केला आहे. MP sambhaji raje reacts sharply to his opponents
मराठा आरक्षणाचे आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णय संभाजीराजे यांनी घेतल्यावर त्यांच्यावर टीका झाली. त्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिले. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण आंदोलन सुरू केले. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या. कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू केले. अजून सात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. मागण्या मान्य होत असताना पुन्हा मोर्चे कशासाठी काढायचे? यापूर्वी ५८ मूकमोर्चे काढले आहेत. सरकारला समाजाच्या भावना कळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तेच तेच कशासाठी? लोकांना नाहक त्रास कशासाठी द्यायचा,’ असा सवालही त्यांनी केला.
संभाजीराजे म्हणाले, की ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय भाजपसह इतर काहींनी घेतला आहे. मोर्चा काढताना जरा आजू बाजूची परिस्थिती पाहा. देश करोनाच्या संकटात आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. गर्दी न करता, उल्लंघन न करता, कोविडचे नियम पाळून यापुढेही आपला लढा सुरू राहील.
संभाजीराजे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर कोल्हापूरात नुकतेच मोठे आंदोलन झाले होते. त्याला भाजपसह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यावरून संभाजीराजे यांनी टीका केली आहे. संभाजीराजे हे मराठा समाजासाठी पुढाकार घेऊन आंदोलन करू इच्छित असताना हे घडल्याने त्याला कोल्हापूरात वेगळा राजकीय रंग आला आहे.
MP sambhaji raje reacts sharply to his opponents
महत्त्वाच्या बातम्या