वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताला भिकेमध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधी यांचा क्रांतिवीर भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता, अशी स्वैर मुक्ताफळे उधळणार्या कंगना राणावतवर देशात सगळीकडून टीकेचा भडिमार होताना दिसतो आहे. पण तिच्यावर टीका करताना अनेकांच्या जिभा सुटल्या आहेत. तिने स्वतः मुक्ताफळे उधळली आहेतच, पण तिच्या टीकाकारांच्या ही मुक्ताफळांची स्टॅंडर्ड काही वरचे नाही.MP Kripal Tumane’s tongue slipped after Vadettiwara
काल काँग्रेसचे महाराष्ट्रातले मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना राणावत हिला “नचनिया” म्हणून घेतले, तर आज शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी कंगनावर त्याहीपेक्षा खालच्या भाषेत टीका केली आहे.
महात्मा गांधी हे सत्तापिपासू असते तर त्यांना त्यावेळी राष्ट्रपती पंतप्रधान अशी कोणती पदे स्वीकारता आली असती पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कंगनाला कुणाचे पाय साठवून आणि कुणा कुणाचे काय काय चाटून पद्मश्री मिळाली आहे दिल्लीतल्या खासदार आमदारांना विचारा ते सगळ्यांना माहिती आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये कृपाल तुमाने यांनी कंगना राणावत हिच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याबाबत वक्तव्य करताना कंगना एक पायरी उतरली तर तिचे टीकाकार दहा पायऱ्या उतरून खाली आले आहेत.
MP Kripal Tumane’s tongue slipped after Vadettiwara
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी