” अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे.”MP Amol Kolhe’s statement, said – ‘I want to see Ajit Dada as the Chief Minister …
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी अजित पवारांबाबत वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की , ” अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे.”
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे .
तसेच देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन ही कोल्हे यांनी केलं.
MP Amol Kolhe’s statement, said – ‘I want to see Ajit Dada as the Chief Minister …
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई वगळता राज्यात गरब्याला परवानगी; कोरोना नियमांचे पालन करण्याची अट लागू
- गरीब देशांतील मुलांच्या कल्याणासाठी केवळ ५२ अब्ज डॉलर पुरेसे – कैलाश सत्यार्थी
- मुंबईतही चार ऑक्टोबरपासून महापालिकांचा शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट
- पुण्यात युवकाला दाढी करणे पडले दोन लाखांना; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार उघडकीस