विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले. judicial system
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या कारकिर्दीत सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी 8 ऑक्टोबर 2023 रोजी मंडणगड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये या न्यायालयाच्या अतिशय सुंदर अशा नूतन इमारतीचे उदघाटन होणे ही आनंदाची बाब आहे.
न्यायालयाच्या या नूतन इमारतीच्या माध्यमातून लोकांसाठी न्यायदानाची एक गतिशील व्यवस्था तयार झाली असून, याचे श्रेय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात न्यायालयीन पायाभूत सुविधांचा विकास 2014 पासून सुरु असून, आतापर्यंत आमच्या सरकारने न्यायालयाच्या जवळपास 150 इमारतींना मान्यता दिली असून त्यातील अनेक इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. तसेच चिपळूण येथे न्यायालय उभारण्याची मागणी देखील लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे कौतुक करत, यूट्यूबद्वारे न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरु केल्यामुळे, आता न्यायदानाची प्रक्रिया कशाप्रकारे चालते हे सामान्य माणसापर्यंत पोहोचत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि न्याय दिला आहे. यावेळी संविधानाला अपेक्षित असलेला विचार व परिवर्तन साध्य करण्याची जबाबदारी शासन चांगल्या पद्धतीने पार पाडेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात झाले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Moving towards modernization of the judicial system
महत्वाच्या बातम्या
- María Machado : ट्रम्प यांचा नोबेल भंग, पीस प्राइज व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडोंना जाहीर; 20 वर्षांपासून लोकशाहीसाठी लढा
- राहुल गांधी अमेठीत पडले, तेजस्वी यादव राघोपूर मध्ये हरतील; प्रशांत किशोर यांच्या दाव्याने बिहार निवडणुकीत ट्विस्ट
- Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट सस्पेंड; 80 लाख फॉलोअर्स होते
- ठाणे, ओरोस, कुळगाव – बदलापूर मध्ये म्हाडाची दिवाळी भेट; 5,354 घरे आणि 77 भूखंडाची संगणकीय सोडत