• Download App
    राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली; अजितदादांच्या लॉबिंगसाठी बैठकीच्या बातम्या!!|Movements to change state president in NCP; News of Ajitdad's lobbying meeting!

    राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली; अजितदादांच्या लॉबिंगसाठी बैठकीच्या बातम्या!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यासाठी लॉबिंग सुरू करून बैठका बोलवण्याच्या बातम्या आल्या आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या जिल्हाध्यक्षांना आणि आमदारांना तातडीने मुंबईला बोलवून आपल्या घरी बैठक घेत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांना दिल्या आहेत. पण मूळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अजित दादांसारख्या दिग्गज नेत्याला लॉबिंग करावे लागते, हीच खरी राष्ट्रवादीतली “मूळ” बातमी आहे!!Movements to change state president in NCP; News of Ajitdad’s lobbying meeting!

    कारण आत्तापर्यंत महाराष्ट्र राष्ट्रवादीत अजितदादा म्हणतील “पूर्व”, अशी स्थिती होती. मग त्यांच्याकडे संघटनेतील कोणते पद असो अथवा नसो, त्याने फारसा फरक पडायचा नाही. अजितदादांनी त्यांच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्री पद आणि नंतर विरोधी पक्षनेते घेतले. त्यावेळी त्यांनी कुठले उघडपणे लॉबिंग केल्याच्या बातम्या आल्या नव्हत्या, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला संघटनात्मक पातळीवरचे पद मिळावे, अशी इच्छा अजितदादांनी उघडपणे व्यक्त केल्यानंतर त्यांच्या लॉबिंगच्या बातम्या आल्या आहेत.



    त्याचवेळी काल सुप्रिया सुळे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलताना अजित पवारांचे ऐकले जाईल. छगन भुजबळांचेही ऐकले जाईल, असे विधान केले. याचा अर्थ प्रदेशाध्यक्ष “निवडीत” सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्र प्रभारी म्हणून मोठा वाटा असणार आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष बनल्यामुळे पवारांनी त्यांना अलगदपणे अजितदादांच्या वरचे पद दिले आहे म्हणूनच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या “निवडीत” सुप्रिया सुळे आता महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. मग भले त्यांनी अजित पवार हे आपले नेते आहेत, असे वक्तव्य केले असले तरी अजितदादांची निवड केली किंवा दुसऱ्या कुणाचीही निवड केली, तरी सुप्रिया सुळे ही निवड करणाऱ्या समितीच्या महत्त्वाच्या सदस्य असतील, हा यातला “अधोरेखित” भाग आहे.

    … आणि त्यातही ज्या राष्ट्रवादीत अजितदादांचा शब्द पूर्णपणे महाराष्ट्रात “प्रमाण” मानला जात होता, त्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यासाठी अजितदादांना लॉबिंग करावे लागत असल्याच्या बातम्या आल्या, यातच अजितदादांचे आता राष्ट्रवादीत नेमके काय “स्थान” आहे हे देखील “अधोरेखित” होत आहे!!

    Movements to change state president in NCP; News of Ajitdad’s lobbying meeting!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक