विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले. Cyprus-India
करारांचा तपशील:
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि कोरिया पॉलिटेक्निक्स (KOPO)
वैशिष्ट्ये:
या कराराअंतर्गत कोरियातील प्रसिद्ध ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेलवर आधारित प्रगत प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत.
या केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन (NILE)
वैशिष्ट्ये :
या कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रासाठी ‘लाइफलाँग लर्निंग’ अर्थात आयुष्यभर शिक्षण आणि कौशल्य वृद्धीचे व्यापक धोरण तयार करणे हा आहे
बदलत्या तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या गरजांनुसार युवक आणि कर्मचाऱ्यांना सतत नवे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे.
अपस्किलिंग आणि रिस्किलिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करून उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि कैस्टाचे ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्रीन ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी (KAIST-GGGS) आणि ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन (KAIST-GDI)
वैशिष्ट्ये :
RT-MSSU मधील प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी KAIST येथे प्रगत पदव्युत्तर शिक्षण व क्षमता विकासाला चालना मिळणार
RT-MSSU मधील निवडक प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना KAIST येथे मास्टर्स व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार
‘जॉइंट रिसर्च सेंटर ऑन ग्लोबल सस्टेनेबिलिटी’ (JRCGS) या संयुक्त संशोधन केंद्राची स्थापना करणार.
शाश्वत विकासासाठी मानवी संसाधन विकास आणि ज्ञाननिर्मितीला प्रोत्साहन देणारी दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारी विकसित करणे
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर तसेच कोरिया प्रजासत्ताकाच्या शिष्टमंडळामधील KAIST चे डॉ. स्युंग हुन हान, कोरिया पॉलिटेक्निक्सच्या डॉ. यंगआह कांग, NILE च्या मिन-सिऑन पार्क तसेच क्रेविट, के-एस आणि नेक्सॉन टेक्नॉलॉजी या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
MoUs Signed Between Various Organizations at the Cyprus-India Business Forum
महत्वाच्या बातम्या
- Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या
- राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!
- West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द
- CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही