या उपक्रमामुळे राज्यात उद्योग सुलभतेला गती मिळणार असून कायदेमान्य वातावरण निर्माण होणार आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश उद्योग व्यवसाय सुलभ करणे आणि नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीचे बनवणे हा आहे.Devendra Fadnavis
या करारानुसार राज्यातील कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करून उद्योग व्यवसायातील अडथळे दूर करणाऱ्या, कठीण व फौजदारी स्वरूपाच्या कायद्यांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. यासाठी विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी राज्यातील विविध कायद्यांचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर करणार आहे.
या उपक्रमामुळे राज्यात उद्योग सुलभतेला गती मिळणार असून नागरिकांना दिलासा देणारे कायदेमान्य वातावरण निर्माण होणार आहे. या करारावर विधि व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले आणि विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अर्घ्य सेनगुप्ता यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL पुढे ढकलण्याची शक्यता, धर्मशालात सुरू असलेला पंजाब आणि दिल्ली सामनाही रद्द
- महत्त्वाची बातमी: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला, युद्धासारख्या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या!!
- Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!
- Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा