• Download App
    कला, कविता, लेखन, बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान; शरद पवारांचे प्रतिपादनMost contribution of Muslims in art, poetry, writing, Bollywood; Sharad Pawar's statement

    कला, कविता, लेखन, बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान; शरद पवारांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था

    नागपूर : देशात कला कविता लेखन बॉलीवूड सारख्या क्षेत्रात इथल्या अल्पसंख्याकांचे अर्थात मुस्लिमांचे योगदान फार मोठे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. नागपुरात अल्पसंख्यांक समुदायाच्या एका मेळाव्यात ते बोलत होते. Most contribution of Muslims in art, poetry, writing, Bollywood; Sharad Pawar’s statement

    मुस्लिम अल्पसंख्यांकना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी मिळत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छोटा असून देखील मुस्लिम समुदायाला लोकप्रतिनिधित्व देणे आम्ही पुढे असतो. फौजिया खान यांच्यासारख्या खासदारांचे योगदान यामध्ये मोठे आहे. त्याची दखल देशाच्या उपराष्ट्रपतींनी देखील घेतली आहे, असे शरद पवारांनी या मेळाव्यात सांगितले.

    त्याचबरोबर कला, कविता, लेखन यामध्ये उर्दू भाषक अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाचे फार मोठे योगदान आहे. त्यांची क्षमता फार मोठी आहे. बॉलिवूड मध्ये लेखनापासून ते चित्रपट निर्मितीपर्यंत तर त्यांचे योगदान सर्वात मोठे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची आठवण शरद पवारांनी करून दिली.

    Most contribution of Muslims in art, poetry, writing, Bollywood; Sharad Pawar’s statement

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !