• Download App
    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आधीच्या दुर्घटनेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; डॉ. भारती पवार यांच्यानंतर पोहोचले हसन मुश्रीफ MoS (Health) Dr Bharati Pravin Pawar visited Ahmednagar District Hospital following an incident of fire here today that claimed the lives of 11 people.

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आधीच्या दुर्घटनेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; डॉ. भारती पवार यांच्यानंतर पोहोचले हसन मुश्रीफ

    वृत्तसंस्था

    अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील झालेल्या आगीच्या दुर्घटनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती करेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्य शासनाने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे वारंवार आदेश दिले आहेत.MoS (Health) Dr Bharati Pravin Pawar visited Ahmednagar District Hospital following an incident of fire here today that claimed the lives of 11 people.

     

    परंतु तरी देखील अशा घटना घडणे हे दुर्दैवी आहे. या घटनेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले

    या दुर्घटनेनंतर अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येला जबाबदार धरण्याच्या एफआयआर दाखल करण्यात आले आहेत माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त पांडे यांनी दिली.

    हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या जिल्हा रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. तसेच जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली. रुग्णालय प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र सरकारकडून केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याआधी यवतमाळ आणि नाशिक मध्ये अशाच प्रकारे रुग्णालयात दुर्घटना घडून रुग्णांची बळी गेले आहेत. यावरूनच हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाने वारंवार फायर ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. परंतु फायर ऑडिट का झाले नाही? याचे उत्तर त्यांनी दिले नाही.

    MoS (Health) Dr Bharati Pravin Pawar visited Ahmednagar District Hospital following an incident of fire here today that claimed the lives of 11 people.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!