दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्याने येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका स्वाती जोगदंड यांनी निलंबति करण्यात आले आहे. त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे निलंबन करण्याचा निर्णयमहाराष्ट्राच्या गृह विभागाने घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्याने येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका स्वाती जोगदंड यांनी निलंबति करण्यात आले आहे. त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या गृह विभागाने घेतला आहे.More than two children, Superintendent of Yerawada Jail suspended
२००५ च्या महाराष्ट्रा सेवा नियमानुसार कोणीही लोकसेवकास दोन पेक्षा जस्त अपत्ये असणारी व्यक्ती शासकीय नोकरीत राहू शकत नाही. या नियमानुसार स्वाती जोगदंड यांचे निलंबन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नारायण कराड यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार जोगदंड यांच्याविरुध्दची खातेनिहाय चौकशी आणि महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या सूचना यांनच्यानुसार जोगदंड यांना निलंबति करण्यात आले आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याने २०१६ मध्ये तक्रार केल्यावर यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आली होती.जोगदंड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये होती.
त्यामुळे त्या शासकीय नोकरीस पात्र नव्हत्या. तरीही त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन नोकरी मिळविली. महिला आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांची कारागृह अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती.
तक्रारकर्त्याने म्हटले होते की जोगदंड यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असूनही त्यांनी ही माहिती शासनापासून लपवून ठेवली. खोटी माहिती देऊन शासकीय नोकरी मिळविली. कराड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे
की जोगदंड यांची ६ सप्टेंबर २०१९ पासून चौकशी केली जात आहे. २० जून २०१९ रोजी याबाबतचा चौकशी अहवाल शासनास पात्र झाला.शासनाने चौकशी केल्यावर स्वाती जोगदंड यांनी आपल्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे म्हटले होते.
परंतु, कराड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की कायद्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे जोगदंड यांना निलंबित करण्यात येत आहे.
More than two children, Superintendent of Yerawada Jail suspended
महत्त्वाच्या बातम्या
- भारताला मदत करायला तयार पण स्वत : च्या देशातील परिस्थिती सुधरेना, कोरोना नियमावली पाळण्यासाठी पाकिस्तानच्या १६ शहरांत लष्कर तैनात
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचा रोकड पैशावरील विश्वास वाढला
- माथाडी कामगार बोंबलून थकले, पण ठाकरे सरकारला पाझर फुटेना, नरेंद्र पाटील यांचा आरोप
- कोरोना मदतीत योगी आदित्यनाथांचे आणखी एक पाऊल, रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणार
- कोरोनाविरुध्दच्या लढाईत रेल्वेची कामगिरी, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध