• Download App
    शवविच्छेदनानंतरही ३०० हून अधिक व्हिसेरा रुग्णालयातच पडून, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार|More than 300 viscera remain in hospital even after autopsy, shocking incident in Yashwantrao Chavan Hospital

    शवविच्छेदनानंतरही ३०० हून अधिक व्हिसेरा रुग्णालयातच पडून, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

    गुन्ह्याची उकल करण्यासाठी व्हिसेरा अत्यंत महत्वाचा असतो. परंतु, पिंपर- चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन अहवालानंतरही तब्बल ३०० व्हिसेरा पोलीसांनी ताब्यातच घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे सर्व व्हिसेरा पुणे ग्रामीण हद्दील असल्याचे रुग्णालयाचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.More than 300 viscera remain in hospital even after autopsy, shocking incident in Yashwantrao Chavan Hospital


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गुन्ह्याची उकल करण्यासाठी व्हिसेरा अत्यंत महत्वाचा असतो. परंतु, पिंपर- चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन अहवालानंतरही तब्बल ३०० व्हिसेरा पोलीसांनी ताब्यातच घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे सर्व व्हिसेरा पुणे ग्रामीण हद्दील असल्याचे रुग्णालयाचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

    रुग्णालयाचे शवविच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत शिंगे यांनी सांगितले की संशयित मृत्यूच्या प्रकरणात व्हिसेराचा अहवाल महत्वाचा असतो. त्यामुळे मृत्यूचे निश्तिच कारण समजते. त्यामुळे संशयास्पद मृत्यू झाल्यावर व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला जातो.



    पोलीसांनी व्हिसेरा ताब्यात घेऊन न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचा असतो. त्यातून मृत्यू कशामुळे झाला हे उघड होते. रुग्णालयात पोस्टमार्टेमनंतर शेकडो व्हिसेरा पडून आहेत. आम्ही पोलीसांना विनंती करत आहोत की त्यांनी व्हिसेरा ताब्यात घेऊन तपासणीसाठी द्यावेत मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

    डॉ. शिंगले यांनी सांगितले की रुग्णालयाकडून व्हिसेरा जपून ठेवण्यासाठी सॉल्ट सोल्यूशनमध्ये ठेवला जातो. परंतु, जास्त काळपर्यंत ठेवणे शक्य नसते. व्हिसेरा हा पोटाचा, किडनी, लिव्हर आणि आतड्याचा छोटासा भाग असतो. त्यामुळे तातडीने तपासणी केली नाही तर अपेक्षित निकाल मिळत नाही.

    फौजदारी वकील सुरेश मंचरकर यांच्या म्हणण्यानुसार व्हिसेरा वेळेत तपासणीसाठी पाठविला नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे अनेक खटल्यांमध्ये व्हिसेराच्या अहवालाचा उपयोग होत नाही.

    More than 300 viscera remain in hospital even after autopsy, shocking incident in Yashwantrao Chavan Hospital

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!