विशेष प्रतिनिधी
मुंबई : thackeray pawar government : महाराष्ट्र सह देशात पेपर फुटीचा विषय गाजत असताना लोकसभेमध्ये विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी करायचा डाव आखला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र देखील शिंदे – फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढवण्याचा ठाकरे पवारांचा इरादा आहे. परंतु, पेपर फुटीचा विषय आता महाराष्ट्राने सीबीआय कडे सोपविला आहे. More paper leaks during thackeray pawar government in maharashtra
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात होते. त्या काळात ज्या पेपर फुटी झाल्या, त्याविषयी मात्र ठाकरे – पवार मूग गिळून गप्प आहेत. ठाकरे – पवार सरकारच्या काळात नेमक्या पेपर कुठे झाल्या तरी किती याचा हा लेखाजोखा!!
- 2021 मध्ये पोलीस भरतीचा पेपर फुटला बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवले गेले. परिणामी पोलीस भरती रद्द करावी लागली, नंतर पोलीस भरतीच झाली नाही.
- शिक्षक भरती 2021 – टी ई टी परीक्षेचे पेपर फोडण्यात आले. इथे सुद्धा बोगस शिक्षक भरती करण्यात आले. परिणामी 7000 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. याच बोगस 7000 शिक्षकांना कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट करण्यात आले.
- नोकर भरती विभागाचा अध्यक्ष तुकाराम सुपे याला अटक करण्यात आली, तो आजही तुरूंगात आहे.
- आरोग्य भरती 2021 चा पेपर फुटला. राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य भरती परीक्षा घेतली, परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. कारण, आरोग्य भरतीचे पेपर फुटून मार्केटमध्ये आढळले. आरोग्य भरती रद्द करावी लागली.
- म्हाडा नोकर भरती 2021 चा पेपर फुटला.
- परीक्षा उद्या आहे, सर्व परीक्षार्थी जमले, उद्या सकाळी परीक्षेचा पेपर सुरू होणार त्याआधीच म्हाडा भरतीचे पेपर मार्केट विकण्यासाठी उपलब्ध झाले. शेवटी तत्कालीन विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजता ऑनलाईन येऊन म्हाडा नोकर भरती रद्द केली.
- विशेष म्हणजे यात अडकणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते. परिणामी म्हाडा नोकर भरती रद्द झाली.
- MIDC नोकर भरती 2021 चा पेपर फुटला.
- परीक्षेपूर्वीच पेपर फुटला. परीक्षा रद्द करण्यात आली. नोकर भरतीच झाली नाही.
- ग्रामसेवक व कृषि अधिकारी भरती या सर्व भरतीत मोठा घोटाळा झाला आहे. ग्रामसेवक आणि नोकर भरती परीक्षेचे पेपर फुटला. त्यामुळे ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी भरती सुद्धा रद्द करण्यात आली.
मास्टर माइन्ड् एकच!! नोकर भरती घेणारी सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आणि नोकर भरती विभागाचा अध्यक्ष तुकाराम सुपे. तुकाराम सुपे आता तुरूंगात आहे.
More paper leaks during thackeray pawar government in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- केजरीवालांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी; दररोज 30-30 मिनिटे पत्नी आणि वकिलाला भेटता येईल; औषधे आणि घरचे अन्न खाण्याची परवानगी
- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली!
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भाषण, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार
- मुख्यमंत्री पदाचे नाव कापून महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसचाच वरचष्मा; ठाकरे + पवार ब्रँडला धक्का!!