विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि इतर भागात मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाविरूद्ध कर्नाटकातील मराठी भाषिकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा नेला होता. मराठी भाषिकांवर होणार्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा रोखण्याचा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु खडाजंगी उडालीच.
Morcha of Marathi speakers at the Collector’s Office in Belgaum
मोर्चामध्ये सामील झालेल्या लोकांनी कर्नाटक शासनावर बरेच मोठे आरोप केले आहेत. मराठी भाषिकांना योग्य वागणूक मिळत नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये आदेश कन्नड भाषेमध्येच जारी केले जातात. कन्नड भाषेमध्ये फलक लावले जातात. अशी तक्रार तेथील मराठी भाषिकांनी व्यक्त केली.
मराठी भाषेतून आदेश प्रसिध्द व्हावेत, मराठी भाषेतून फलक लावले जावेत, अनधिकृत लाल पिवळा झेंडा हटवण्यात यावा, त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राची मागणी आणि मराठी भाषिकांना हक्क मिळाले पाहिजेत या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.
धर्मवीर संभाजी चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चाला पोलिसांनी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही लोकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. काहींनी पर्यायी मार्गाने जिल्हाधिकार्यांकडे कूच केली. आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. परंतु आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात यशस्वी ठरले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे शुभम शेळके यांसह युवकांनी महिलांचा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
Morcha of Marathi speakers at the Collector’s Office in Belgaum
महत्त्वाच्या बातम्या
- STORY Behind SAMNA Editorial:खबरदार महाराष्ट्रात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई कराल तर…निष्पाप रिया-आर्यनसारख्या मुलांना छळाल तर … ठाकरे-पवार सरकार हे ‘उपद्व्याप’ खपवून घेणार नाही …!
- एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; सरकारने दिली ‘ ही ‘ भेट
- नवाब मलिकच बनले आर्यन खानचे वकील एवढा का पुळका का आलाय – चंद्रकांत पाटील
- Bank Holidays November 2021 : नोव्हेंबरमध्ये 17 दिवस बँका बंद राहणार! ही आहे सुट्यांची यादी!