• Download App
    देव दर्शनासाठी ऑनलाईन पास सेवा रद्द करण्यात यावी यासाठी भाजप पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | Morcha at BJP Collector's office for cancellation of online pass service for Dev Darshan

    देव दर्शनासाठी ऑनलाईन पास सेवा रद्द करण्यात यावी यासाठी भाजप पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : सध्या दिवस सणाचे आहेत. गणपती पाठोपाठ दुर्गा उत्सव झाला. आणि आता दिवाळी येणार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले होते. त्याचसाठी कोल्हापूर आणि ज्योतिबा या देवस्थानांमध्ये दर्शनासाठी ऑनलाईन पास सुरू करण्यात आला होता.

    Morcha at BJP Collector’s office for cancellation of online pass service for Dev Darshan

    दुर्गा उत्सवामध्ये या ऑनलाईन पासमुळे भाविकांमध्ये मात्र प्रचंड गोंधळ उडाला होता. कारण वयोवृद्ध, लहान मुले यांना घेऊन येणारे बरेच लोक होते. बऱ्याच लोकांनी आधार कार्ड घरी विसरले होते. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन पास दर्शनासाठी असू नये अशी मागणी भाजपकडून कोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे. या विरुद्ध आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.


    जोतिबा दर्शनासाठी आलेले भाविक इ पास सेवेमुळे वैतागले! दर्शनासाठी भर उन्हात भल्या मोठ्या रांगा


    भाजप पक्षाचे कोल्हापूर अध्यक्ष शांतनू मोहिते यांच्या मते, 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. फक्त पश्चिम महाराष्ट्र दर्शन समितीने मात्र दर्शनासाठी ऑनलाईन पास ही सुविधा अजूनही सुरू ठेवली आहे. यामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या बऱ्याच छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांचे नुकसान होत आहे आणि याची आता काही गरजही नाही. असे त्यांचे म्हणणे होते.

    Morcha at BJP Collector’s office for cancellation of online pass service for Dev Darshan

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस