• Download App
    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    नाशिक : तारीख बदलून मोर्चा हा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??, असा सवाल राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलाय. राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातला आवाज बुलंद केल्यानंतर तो विषय महाराष्ट्रात ऐरणीवर आला. राज ठाकरे आवाज उठवेपर्यंत कुठल्या विरोधी पक्षाला त्या विषयाचे महत्त्वच वाटले नव्हते पण राज ठाकरेंनी आवाज उठवला आणि त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला. Thackrey brothers

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला पण राज ठाकरे यांची समजूत निघाली नाही. त्यांनी हिंदी सक्ती विरोधात मोर्चाचे ऐलान केले. त्यासाठी त्यांनी 6 जुलैची तारीख देखील ठरवून टाकली. पण अचानक सायंकाळी राज ठाकरेंनी ती तारीख बदलून आदल्या दिवशीची घेतली. हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चात कोणाचेही झेंडे नसतील. फक्त मराठी प्रेमी एकत्र येतील, असे त्यांनी जाहीर केले.



    पण प्रत्यक्षात राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे मोर्चा 6 जुलैला होणार होते आणि उद्धव ठाकरेंचे आंदोलन‌ 7 जुलैला होणार होते. अशी वेगवेगळी आंदोलने नकोत. त्यापेक्षा एकच आंदोलन व्हावे, या विचाराने राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलल्याचे सांगण्यात येतेय. हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनात दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ आणि आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहू, असा प्रस्ताव राज ठाकरेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना दिल्याचे समजतेय.

    याचा अर्थ असा की हिंदी सक्तीच्या विरोधातला मोर्चा हा खरंच हिंदी सक्ती विरोधात आहे की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी आहे??, असा सवाल या निमित्ताने समोर आलाय. दोन्ही ठाकरे बंधू एक व्हावेत यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक उतावळे झालेत. दोन्ही बाजूच्या निवडक नेत्यांचा या ऐक्याला विरोध आहे, पण त्या पलीकडे जाऊन सत्ताधारी भाजपने त्यांच्यात मेख म्हणजे पाचर मारून ठेवली आहे. आता ही पाचर उखडून ऐक्य साधायचे ठाकरे बंधूंच्या पुढे आव्हान आहे. हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा ही निमित्त आहे, पण हे निमित्त साधून आपण खरंच एक झालो असा संदेश दिला तर लोक आपल्याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी या मोर्चाचा वापर केला जाणार आहे. ही यातली खरी मख्खी आहे.

    Morcha against compulsory Hindi, but litmus test for Thackrey brothers unity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचा गौरव केल्याने सर्व विरोधकांचा चडफडाट; संघ चीन पेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कांगावा!!

    Somnath Suryavanshi : हायकोर्टाचे निर्देश; सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी चौकशी समिती बरखास्त; 1 आठवड्यात SIT स्थापन करा

    Govind Giri Maharaj : आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित होण्याची भीती; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भाजपच्या आयात संस्कृतीवर टीका