Monsoon session 2021 : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन दोनच दिवसांत घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले आहे. एमपीएसपी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतींअभावी नोकरी न लागलेल्या स्वप्निल लोणकर या पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येने अधिवेशन दणाणून गेले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. Monsoon session 2021 Live updates, devendra fadnavis sudhir mungantiwar takes a dig At MVA Govt On Swapnil Lonkar Suicide issue
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन दोनच दिवसांत घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले आहे. एमपीएसपी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतींअभावी नोकरी न लागलेल्या स्वप्निल लोणकर या पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येने अधिवेशन दणाणून गेले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी वाचली स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची सुसाइड नोट सभागृहात वाचून दाखवली. ते म्हणाले की, एमपीएससीचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घ्यावा. एमपीएससी मायाजाल असं लिहून त्याने जीवन संपवलं आहे. नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. अजून किती स्वप्निल होतील? सरकार याबाबत काही कारवाई करणार की नाही? सगळं कामकाम बाजूला ठेवून MPSCवर चर्चा करा म्हणत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. ते पुढे म्हणाले की, MPSCबाबत सरकार गंभीर नाही, राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, आयोग काय करतंय? विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. एमपीएससी मुद्द्यांवर भाजपचा स्थगन प्रस्तावही आला.
४३० एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा – मुनगंटीवार
भाजप नेते व राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं. मुनगंटीवार म्हणाले की, एमपीएससीच्या 430 विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा सरकारला दिलाय. कालपासून १०० विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले. मुख्यमंत्र्यांना आपली अडचण सांगण्याची मागणी केली आहे. नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. अधिकाऱ्यांच्या रिटायरमेंट वाढवू शकतात, पण नोकरीची वयोमर्यादा वाढवू शकत नाहीत? स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. एवढंच नाही, तर त्यांनी स्वप्निलच्या आईची मुलाखतही सभागृहात दाखवण्याची मागणी केली.
Monsoon session 2021 Live updates, devendra fadnavis sudhir mungantiwar takes a dig At MVA Govt On Swapnil Lonkar Suicide issue
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Assembly Monsoon session 2021 : 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा
- FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, जूनमध्ये भारतीय बाजारात तब्बल 13,269 कोटींची गुंतवणूक
- जळगावातील शिवसेनेचा आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्याने खळबळ
- धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद, आर्थिक संकटामुळे जळगावात 2 व्यावसायिकांच्या आत्महत्या
- Maharashtra Assembly Monsoon session 2021 : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, हे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता, वाचा अध्यादेशांची यादी