नाशिक : शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ चिन्ह अजित पवार आपल्या बहुमताच्या बळावर स्वतःकडे घेऊन गेले. त्यामुळे आता शरद पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी नव्या चिन्हासह नवा पक्षाचे नाव घेऊन नवी राजकीय सुरुवात करावी लागणार आहे.Monoj jarange patil’s agitation will provide human resources for sharad pawar’s new political party
मराठी माध्यमांमध्ये शरद पवारांच्या चाणक्यगिरीच्या आणि ते म्हातारे नसल्याच्या कितीही बातम्या आल्या, तरी प्रत्यक्षात पक्ष उभा करणे, त्यासाठी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची फळी उभी करणे हे नुसत्या बातम्या देण्याएवढे सोपे नाही. त्यापलीकडे जाऊन प्रचंड मोठी मेहनत करून कार्यकर्ते आणि नेते तयार करावे लागतात. पक्षाची बांधणी करावी लागते आणि पक्षाची निवडणूकक्षम यंत्रणा उभी करावी लागते. हे सगळे पवारांना आता नव्याने त्यांच्या वयाच्या 84 व्या वर्षी करावे लागणार आहे. त्यासाठी केवळ पवारांचा 60 वर्षांचा राजकीय अनुभव या भांडवलावर नवा पक्ष, नवे चिन्ह उभे राहणे कठीण आहे, *पण पवारांचा अनुभव उपयोगी पडलाच, तर तो त्यांनीच “इंधनपुरवठा” केलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनातून स्वतःच्या नव्या पक्षासाठी “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” करवून घेताना उपयोगी पडेल, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कारण अजित पवार हे फक्त शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे घड्याळ चिन्हच घेऊन गेले असे नाही, तर त्यांनी पवारांनी तयार केलेले आणि निवडणुकीच्या राजकारणात तरबेज असलेले सगळे नेते आणि कार्यकर्ते आपल्या बरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला नेले आहेत आणि हा खऱ्या अर्थाने शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का आहे.
नव्या पक्षाची बांधणी करताना केवळ पवारांना नुसती संघटना बांधून चालणार नाही, तर त्यापुढे जाऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असणारे नवे उमेदवार तयार करावे लागतील आणि त्यांना सत्ता आपण मिळवू शकतो हा विश्वास त्यांच्यात भरावा लागेल. हे काम पवारांनी फार पूर्वी केले देखील आहे, पण ते फार मर्यादित अर्थाने. पवार स्वबळावर 50 ते 60 आमदार निवडून आणू शकतात इतपतच ते स्वतःची राजकीय ताकद दाखवू शकले होते.
पण आता वयाच्या 84 व्या वर्षी नवा पक्ष उभारणीचे काम काम करताना त्यांना खऱ्या अर्थाने राजकीय मनुष्यबळाचा इंधनपुरवठा लागेल आणि तो करवून घेण्याच्या दृष्टीनेच त्यांनी कदाचित आधीच जरांगे पाटलांना मराठा आरक्षण आंदोलनासाठी वेगळा “इंधनपुरवठा” केला असण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटलांचे आंदोलन विशिष्ट उंचीवर पोहोचले. त्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला. ते आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या कार्यकर्त्यांना मराठा समाजात नाव मिळाले. या सगळ्याचा राजकीय लाभ उठवण्याच्या दृष्टीने पवार जरांगे पाटलांच्या आंदोलनातून आपल्या नव्या पक्षासाठी “मनुष्यबळाचा इंधन पुरवठा” करवून घेऊ शकतात आणि त्या मनुष्यबळाच्या इंधनातूनच काही प्रमाणात का होईना, पण ते आपल्या पक्षात निवडणूक जिंकण्याची क्षमता असणारे नेते आणि कार्यकर्ते तयार करू शकतात, असा काही राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
पवारांच्या मतांची टक्केवारी
पण कितीही झाले, तरी हा अंदाजच आहे. कारण जरांगे पाटलांचे आंदोलन जरी मोठे झाले असले, त्यांना मराठा समाजातून पाठिंबा मिळाला असला, तरी एक विशिष्ट अभ्यास असे सांगतो की, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात 12 ते 15 % या पलीकडे ते मते मिळवू शकणार नाहीत. अशा स्थितीत शरद पवार या नावाचा ब्रँड आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनातून उपलब्ध होणारे “मनुष्यबळाचे इंधन” असे बेरजेचे राजकारण केले, तर पवार आपले मतांचे गणित 18 ते 20 % पर्यंत पोहोचवू शकतात, जो राष्ट्रवादीचा मतांचा मूळ टक्का आहे. त्यामुळे पवार नवीन पक्ष बांधणी करताना जरांगे पाटलांच्या आंदोलनातून “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” करवून घेतील, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे
Monoj jarange patil’s agitation will provide human resources for sharad pawar’s new political party
महत्वाच्या बातम्या
- दमलेल्या काकाची कहाणी
- NCP : सुप्रिया सुळे या “वाय. एस. शर्मिला” का होऊ शकत नाहीत??
- NCP : “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी”, “उगवता सूर्य”; पक्षाचे नवे नाव आणि चिन्हावर शरद पवार गटात खलबते!!
- NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर पवारांची “ताजी” प्रतिक्रिया नाही; थकणारही नाही, थांबणारही नाही, हा जुनाच व्हिडिओ व्हायरल!!