• Download App
    मोहितेंचा प्रभाव माळशिरसपुरता, तुतारी किंवा पिपाणी हाती घेतली तरी फरक पडणार नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे भाकित!!|Mohit's influence does not matter whether Malshiraspurta, Tutari or Pipani take up; Ajit Dada's Nationalist Prediction!!

    मोहितेंचा प्रभाव माळशिरसपुरता, तुतारी किंवा पिपाणी हाती घेतली तरी फरक पडणार नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे भाकित!!

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : मोहिते पाटील घराण्यातले धैर्यशील मोहिते हे कमळ सोडून आता तुतारी धरणार असले, तरी प्रत्यक्षात मोहित्यांचा प्रभाव फक्त माळशिरस पुरता मर्यादित आहे त्यांनी तुतारी किंवा पिपाणी हाती घेतले तरी फरक पडणार नाही, असे भाकित अजितदादांच्या राष्ट्रवादीने वर्तविले आहे.Mohit’s influence does not matter whether Malshiraspurta, Tutari or Pipani take up; Ajit Dada’s Nationalist Prediction!!



    महविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून अजून तरी शरद पवारांना उमेदवार देता आलेला नाही. त्यासाठीच मोहिते पाटलांचे घर पुन्हा एकदा फोडून धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्याकडे घेऊन त्यांच्या हाती तुतारी सोपवण्याचा पवारांचा मनसूबा आहे. त्यावरूनच अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

    उमेश पाटील म्हणाले, मोहिते पाटील घराणे आता भूतकाळ झाला आहे. त्यांचे अस्तित्व फक्त माळशिरस तालुक्यापुरते उरले आहे. मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी घेतली काय, त्याने काहीच फरक पडणार नाही. मोहिते पाटील कुटुंबाला सत्तेचा मलिदा घ्यायचा होता. यासाठी भारतीय जनता पार्टीचा त्यांनी वापर करून घेतला. आता खासदाकीची स्वप्न त्यांना पडू लागली आहेत. परंतु, तुतारी त्यांना झेपणार नाही. तुतारी फुंकताना त्यांना लगेच दम लागेल, असे शरसंधान उमेश पाटील यांनी साधले.

    Mohit’s influence does not matter whether Malshiraspurta, Tutari or Pipani take up; Ajit Dada’s Nationalist Prediction!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस