मुंबईत जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनात मोदी सरकारबद्दल बोलताना, एक सूचक विधान केलं आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रसंगी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती होती.Modis ten years was just a trailer the next five years will be even excellent Devendra Fadnavis statement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘दहा वर्षे आपण मोदींचं राज्य बघितलं, दहा वर्षांत बदललेला भारत बघितला. जगामध्ये बदललेली भारताची प्रतिमा आपण बघितली. भारताच आत्मसन्मान, स्वाभिमान भारतीयांचा आत्मभिमान सगळं बदलेलं आपण बघितलं. एक मजबूत भारत होताना आपण बघितला. पण मोदींच्या ज्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना पाहिल्यानंतर मी असं म्हणेण. दहा वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है. पुढची पाच वर्षे ही या दहा वर्षांपेक्षाही भारी असणार आहेत.’
तत्पूर्वी फडणवीस म्हणाले, ‘भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलं, मोदी म्हणाले की तिसऱ्यांदा या भारतामध्ये आम्ही सरकार तयार करणार आहोत. पण तिसऱ्यांदा सरकार तयार करताना आमची प्रेरणा काय आहे? मोदी म्हणाले आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. पण राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी कधीही ते राज्य भोगलं नाही. दुसऱ्या दिवसापासून ते स्वराज्याच्या विस्तारासाठी बाहेर पडले. थेट स्वर्गवासी होईपर्यंत देशाची सेवा ते करत राहीले. मोदी म्हणाले आम्हालाही राज्य यासाठीच हवं आहे. एकही दिवस, एकही क्षण आम्हाला घरी बसायचं नाही. या भारतमातेची सेवा करून विकसित भारत आम्हाला तयार करायचा आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा आम्हाला राज्य हवं आहे.’
‘पुढची पाच वर्षे विकसित भारताची मुहूर्तमेढ करणारी असणार आहेत, भारताला आर्थिक महासत्ता बनवणारे असणार आहेत, भारताच्या गरिबी निर्मुलनाच्या अंतिम लढ्याचे असणार आहेत, भारताला जगाचं नेतृत्व करणारे असणार आहेत आणि जगाला हेवा वाटावा अशा भारताच्या निर्मितीकडे घेऊन जाणारे असणार आहेत.’
मोदींनी आपल्याला भाजपाचे कार्यकर्ते म्हणून केवळ १०० दिवस आपल्याला मागितले आहेत. हे शंभर दिवस भाजपासाठी नाहीतर हे शंभर दिवस भारतासाठी आपल्याला द्यायचे आहेत. कारण, भारताचं भवितव्य हे मोदींच्या हातून घडणार आहे. भाजपा निवडून आणण्यापेक्षा भाजपाला मजबूत नेता आणि मजबूत सरकार देणं हा या पाठीमागचा आपला उद्देश आहे. म्हणून एका मोठ्या ध्येयासाठी आपण सगळे मैदानात उतरलो आहोत.’
Modis ten years was just a trailer the next five years will be even excellent Devendra Fadnavis statement
महत्वाच्या बातम्या
- संत फिंत म्हणून आधी जरांगेकडून तुकाराम महाराजांचा अपमान, नंतर माफी; जवळच्या मित्रावरही शरसंधान!!
- पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्यूला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!
- रविशंकर प्रसाद यांचे ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र, म्हणाले…
- पाकिस्तानकडे उरले फक्त ३० दिवस, तब्बल तीन अब्ज डॉलर्सचे कर्जही थकले!