विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजीव गांधींच्या 21व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!
त्याचे झाले असे :
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायंकाळी लोकसभेत उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या वेगवेगळ्या भूमिकांचे समर्थन करताना जुन्या पंतप्रधानांचा आणि त्यांच्या सरकारांच्या कामगिरीचा उल्लेख केला. त्यामध्ये त्यांनी राजीव गांधींच्या भाषणाचा एक संदर्भ दिला राजीव गांधी नेहमी आपल्या भाषणातून 21 व्या शतकाच्या भारताची स्वप्ने दाखवत असत. त्यावेळी प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये राजीव गांधींच्या 21 व्या शतकाच्या भाषणबाजीची खिल्ली उडवणारे एक कार्टून काढले होते. राजीव गांधी पायलट असल्याने विमानात ते बसलेत. काही प्रवासी त्या विमानात आहेत, पण ते विमान हवेत न उडवता ते एका हातगाडीवर ठेवून काही कामगार ते ढकलत आहेत, असे ते व्यंगचित्र होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यावेळी ते व्यंगचित्र मजेदार वाटले. परंतु, ते चित्र नंतर खरंच वास्तवात उतरल्याचे दुर्दैवाने दिसले. त्यावेळच्या पंतप्रधानांनी 21 व्या शतकाची स्वप्न जरूर दाखवली, परंतु ते विसाव्या शतकातल्या गरजा देखील पूर्ण करू शकले नव्हते. ते पंतप्रधान जमिनी वास्तवापासून किती दूर होते, हेच लक्ष्मण यांनी कार्टून मधून दाखवून दिले होते. देश त्यावेळी 40-50 वर्ष मागे पडला. 40-50 वर्षांपूर्वीची काम व्हायला हवी होती, ती कामं तेव्हा झाली नाहीत. ती आत्ता करावी लागत आहेत, याची आठवण मोदींनी लोकसभेत करून दिली.
Modi told the story in the Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Ravi Shankar महाकुंभातील चेंगराचेंगरी हे एक षड्यंत्र! भाजप खासदार रविशंकर यांचा संसदेत दावा
- Talkatora Stadium आता दिल्लीच्या ‘तालकटोरा स्टेडियम’चे नाव बदलणार!
- Ayodhya : अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:3 दिवस बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
- गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांचा नाशिक मध्ये गुरुवारी भव्य सन्मान सोहळा