Wednesday, 7 May 2025
  • Download App
    Modi - Pawar - MNS : माझ्या पुतण्याला वाचवा दिल्लीत अर्थ हाका; पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचे शरसंधान!!। Modi - Pawar - MNS: Save my nephew, make money in Delhi; MNS's support on Pawar's Modi visit !!

    Modi – Pawar – MNS : माझ्या पुतण्याला वाचवा दिल्लीत अर्थ हाका; पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचे शरसंधान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करा असे सांगितले होते, पण ईडीने राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मनसेने आता त्यापुढे जाऊन शरद पवार यांच्या मोदी भेटीवर शरसंधान साधले आहे. Modi – Pawar – MNS: Save my nephew, make money in Delhi; MNS’s support on Pawar’s Modi visit !!

    1773 साली “काका मला वाचवा”अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात”माझ्या पुतण्याला वाचवा”अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या. असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.



    शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपण संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला. संजय राऊत हे पत्रकार आहेत. राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांच्यावरची कारवाई गरजेची होती का?, असा सवाल पंतप्रधानांना विचारला असे स्पष्ट केले होते.

    परंतु मनसेने मात्र शरद पवारांच्या मोदी भेटीचा वेगळाच अर्थ लावला असून त्या भेटीचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याच्या जप्तीशी जोडला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांनी गुरू कमोडिटीच्या नावाखाली अल्प किमतीत विकत घेतला आहे. आधी तो कारखाने दिवाळखोरीत नेला आणि नंतर तो पवारांच्या नातेवाईकांनी विकत घेतला. त्यामुळे ईडीने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा संदर्भ जोडत माझ्या पुतण्याला वाचवा हो, अशा आर्त हाक का दिल्लीत ऐकू आल्या, असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

    Modi – Pawar – MNS: Save my nephew, make money in Delhi; MNS’s support on Pawar’s Modi visit !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट