• Download App
    भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था करण्याची युवकांची जबाबदारी आणि सामर्थ्य; नाशिकच्या मंत्रभूमीतून मोदींनी दिला युवकांना महामंत्र!! Modi gave a Mahamantra to the youth from Nashik Mantrabhoomi

    भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था करण्याची युवकांची जबाबदारी आणि सामर्थ्य; नाशिकच्या मंत्रभूमीतून मोदींनी दिला युवकांना महामंत्र!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन देशातील सर्व पिढ्यांच्या युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या तीनमध्ये झाली आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन आता देशात होत आहे. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. यासर्वांचे आधार भारताचे युवापिढी आहेत. भारताच्या युवकांचे सामर्थ्यामुळे भारताचा डंका जगात वाजत आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची जबाबदारी आणि सामर्थ्य या युवा पिढीमध्ये आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात व्यक्त केला. Modi gave a Mahamantra to the youth from Nashik Mantrabhoomi

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधून प्रचंड शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा नारळच फोडला. देशातल्या घराणेशाहीचा अस्त करायचा असेल तर युवकांनी जास्तीत जास्त जास्तीत जास्त युवकांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला पाहिजे आणि घराणेशाहीच्या प्रतिनिधींना दूर सारले पाहिजे, असे परखड आवाहन पंतप्रधान मोदींनी देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांना केले.

    पंतप्रधान मोदी म्हणाले :

    स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात देशाला नवीन उंचीवर नेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही असे काम करा की भारताचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. यामुळे तुम्हाला मी २१ व्या शतकातील सर्वात भाग्यशील पिढी समजतो. माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवकांवर आहे.

    स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी देशासाठी आपले जीवन दिले. त्यांनी देशाला नवी स्वप्न दिले. आता मेरा युवा भारत संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. संघटनेची स्थापना होऊन ७५ दिवस झाले नाही परंतु एक कोटीपेक्षा जास्त युवकांनी या संघटनेत नाव नोंदणी केली आहे. तरुणांना मोकळीक देण्यासाठी सर्व अडथळे दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात त्यांना वाव देण्याचा आम्ही गेल्या दहा वर्षात प्रयत्न केला आहे. आम्ही एक आधुनिक आणि डायनॅमिक इको सिस्टिम करायला घेतली आहे.

    महाराष्ट्र वीरपुत्रांची धरती

    राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवींसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे सार्वत्रीकरण केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा अनंत कान्हेरे, दादासाहेब फाळके आदी महापुरुष महाराष्ट्राच्या धरतीने संपूर्ण देशाला दिले. हा अभिमानाचा वारसा युवकांनी पुढे नेला पाहिजे.

    – आजही आपण वीर सावरकरांच्या सारख्या क्रांतिकारकांची आठवण करतो. त्यांनी इंग्रजांना नेस्तानाबूत केले होते. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठं योगदान दिलं. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच देह ठेवला. काळ प्रत्येकाला त्याच्या जीवन काळात एक संधी देत असतो. भारताच्या तरुणांना ही संधी आहे. हा अमृत काळाचा कालखंड आहे. आज तुमच्याकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. इतिहासात आपल्या नावाची नोंद करण्याची संधी आहे.

    Modi gave a Mahamantra to the youth from Nashik Mantrabhoomi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!