Monday, 5 May 2025
  • Download App
    धक्कादायक : गाझियाबाद - मुंब्रा कनेक्शन; मोबाईल गेम जिहादमधून एकट्या मुंब्रातून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर!!|Mobile game jihad; 400 boys converted to Islam in mumbra itself, claimed accused Abdul Ansari

    धक्कादायक : गाझियाबाद – मुंब्रा कनेक्शन; मोबाईल गेम जिहादमधून एकट्या मुंब्रातून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर!!

    प्रतिनिधी

    ठाणे : लव्ह जिहात पाठोपाठ आता मोबाईल जिहादचे भयानक रूप समोर आले आहे. गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन मधून एक दोन नव्हे तर तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्याचे डीसीपी निपुण अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात तब्बल 400 मुलांचे धर्मांतर एकट्या मुंब्रात झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भातली माहितीही छाननी पोलीस करत असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.Mobile game jihad; 400 boys converted to Islam in mumbra itself, claimed accused Abdul Ansari

    या संदर्भातील माहिती अशी :

    एक 17 वर्षीय जैन मुलगा बेपत्ता झाला. नंतर तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या मशिदीत नमाज पढत असताना सापडला. झाकीर नाईकच्या प्रभावाने धर्मांतराचा विचार केल्याचे त्याने कबूल केले. या मुलाच्या वडिलांनी इमाम आणि अन्य एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.



    मात्र या तक्रारीतून मोबाईल गेम जिहादचा एक गंभीर प्रकार समोर आला. त्यात मस्जिद समितीच्या एका माजी सदस्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गाझियाबाद मधलाच रहिवासी आहे, तर त्याचा साथीदार ठाणे मुंब्रा इथला रहिवासी असून त्याचे खरे नाव शहानवाज मकसूद खान असे आहे. तो बड्डो या बनावट नावाने मोबाईल गेमच्या खेळात अल्पवयीन मुलांना अडकवायचा डाव खेळत असे. याच शहानवाज मकसूद खान याने मुंब्रा परिसरात 4 00 मुलांचे धर्मांतर केल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी यांनी पोलिसांना दिली. पोलीस या माहितीची छाननी करत आहेत.

    मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकरणातला मुख्य आरोपी शहानवाज मकसूद खान हा मुंब्रा परिसरातून फरार झाला आहे. 1 जून रोजी त्याने आपले कुटुंब सोलापूरला हलविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर तो गायब झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे डीसीपी निपूण अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

    धर्मांतराची मोडस ऑपरेंडी

    फोर्टनाइट सारख्या गेमिंग एप्सवर सक्रिय असलेली एक टोळी हिंदू मुलांचे ब्रेनवॉश करते आणि त्यांना गेम जिंकण्यासाठी कुराणाचे श्लोक वाचायला लावते, असे गाजियाबाद पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

    यात पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी देखील स्पष्ट केली आहे. बनावट नावाने गेमिंग ॲप तयार करून अल्पवयीन मुलांना टॅप केले जायचे. ते जिंकले तर त्यांना बक्षीस आणि हरले तर त्यांना कुराणाच्या आयाती पढवल्या जायच्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात त्यांना इस्लामची माहिती दिली जायची आणि त्यानंतर झाकीर नाईकची इस्लामी प्रचाराची भाषणे ऐकवली जायची. यातून मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करायला लावायचे हा डाव होता.

    गाजियाबाद मध्ये अटक केलेला अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी हा मशिद कमिटीचा सदस्य होता. परंतु त्याला नंतर त्या सदस्य पदावरून बाजूला करून इस्लामच्या प्रचारासाठी मोकळे सोडण्यात आले होते. त्याची आणि ठाणे – मुंबऱ्यातील शहानवाज मकसूद खान याची ओळख झाली आणि त्यांनी वेगवेगळे मोबाईल गेम्स सापळे रचले. त्यात एक जैन मुलगा अडकला. त्या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा मोबाईल गेम जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

    यातूनच मुंब्रा परिसरात एक दोन नव्हे, तर तब्बल 400 जणांचे धर्मांतर केल्याची कबुली अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ लव्ह जिहादच नव्हे, तर मोबाईल गेम जिहाद किती भयानक पद्धतीने सक्रिय आहे हे स्पष्ट झाले आहे.

    Mobile game jihad; 400 boys converted to Islam in mumbra itself, claimed accused Abdul Ansari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’