प्रतिनिधी
परभणी : परभणी तालुक्यात पालघर सारखी मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. परभणीतील उखळद गावात इदगाहासमोर ग्रामस्थांनी बकरी चोर समजून 3 शीख मुलांना बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी मुख्य आरोपी माजी सरपंच अक्रम पटेलसह याच्यासह चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. Mob lynching of Sikh children near Idgah in Parbhani
तरुण रात्री उशिरा गावातून जात होते
घटनेबाबत परभणी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांनी सांगितले की, कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. तिघेही चोर असल्याचा संशय ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली. यापैकी कृपानसिंगचा नंतर मृत्यू झाला. तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
मारहाणीनंतर ग्रामस्थांचा पोलिसांना फोन
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, ग्रामस्थांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून तीन बकरी चोरांना पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी तिघांचीही जमावापासून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
चौघांना अटक
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 4 जणांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी माजी सरपंच अक्रम पटेल याचाही समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Mob lynching of Sikh children near Idgah in Parbhani
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- महाराष्ट्रात 95000 कोटींची गुंतवणूक येणार; नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणास शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता
- मोदी सरकारच्या ९ वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत तब्बल २३ पटीने वाढ, ८५ देशांना विकली शस्त्रास्त्रे!
- मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदण्याचा अखेरचा टप्पा पूर्ण