प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ठाकरे – पवार सरकारला चपराक लगावली आहे. हे प्रकरण काल्पनिक असून कुठल्याही तथ्यांवर आधारलेले नाही, असा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे. MNS: Sandeep Deshpande, Santosh Dhuri’s crime is factless; Court slaps government !!
– न्यायालयाचा निर्णय
या दोघांवरही करण्यात आलेले आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळून आले नाही. आरोपींच्या कोठडीसाठी कोणतेही ठोस कारण नसल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करता येणार नाही. तपास अधिकाऱ्यांच्या कल्पनाशक्तीच्या आधारे केस बनू शकत नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जाणीवपूर्वक कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असेही सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
– पोलिसांवर दबाव
खरंतर ही पोलिसांपेक्षा राज्य सरकारला चपराक आहे. कारण पोलिस दबावाखाली काम करत होते. त्यामुळे आमच्यावर चुकीची कलमे लावण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सरकारच्या कारभारावर टीका केल्यामुळे जर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जाणार असतील, तर आमचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा धक्का कुणालाही लागला नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो. तोच निर्णय आता न्यायालयाने दिला आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
MNS: Sandeep Deshpande, Santosh Dhuri’s crime is factless; Court slaps government !!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला नवसंजीवनी : उदयपूरच्या चिंतन शिबिरातून राहुल गांधी जोधपुरी सुटात केंब्रिज विद्यापीठात!!
- नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध; पीएमएलए कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण!!
- CNG Price Hike : पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर पाठोपाठ सीएनजी दरवाढ!!
- शरद पवार आज ब्राह्मण संघटनांशी काय बोलणार??; पुण्यात चर्चेचे निमंत्रण, पण…