सुलोचना दीदींना राज ठाकरेंची भावपूर्ण श्रद्धांजली
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. MNS President Raj Thackeray pays tribute to Sulochana Latkar
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्वीटद्वारे म्हटलं आहे की, ‘’ सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण ‘आई’ पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.’’
याशिवाय ’सुलोचना दीदींच्यात ‘आईपण’ हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य. एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही. सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.’’ असं म्हणत मनसेने श्रद्धाजंली अर्पण केली आहे.
सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. आज सोमवारी ( ५ मे ) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
MNS President Raj Thackeray pays tribute to Sulochana Latkar
महत्वाच्या बातम्या
- ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल जगभरातील नेत्यांनी व्यक्त केला शोक; पाक, कॅनडा, ब्रिटनचे पंतप्रधान काय म्हणाले? वाचा सविस्तर…
- ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म
- हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल