नाशिक : महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे भरभक्कम पाठिंबाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेने निवडणुका लवकरात लवकर होतील अशा अटकळी सगळ्या पक्षांनी बांधले होत्या, पण त्या प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे अद्याप तरी दिसली नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्फोटक भाषणानंतर मनसेने आता पुढाकार घेऊन मुंबईत प्रति महापालिका उभारायची तयारी चालवली आहे. राज ठाकरे यांनी मुंबई शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेल्या संदीप देशपांडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या प्रति महापालिकेमध्ये प्रति महापौर आणि प्रति अन्य पदाधिकारी असतील. प्रति महापालिकेत लोक येऊन आपापले प्रश्न मांडतील. ते लोकप्रतिनिधींची भूमिका बजावतील आणि त्यांनी मांडलेले प्रश्न घेऊन आम्ही प्रशासनाकडे जाऊ, असे संदीप देशपांडे म्हणाले. संदीप देशपांडे यांनी आपली उपक्रमशीलता प्रति महापालिकेच्या निमित्ताने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालवला.
पण असाच एक प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता. महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाखाली कुठले कॅबिनेट स्थापन करता आले नाही म्हणून काय झाले, आपण शॅडो कॅबिनेट काढू असे म्हणून त्यांनी शॅडो कॅबिनेट नेमण्याची हौस भागवून घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांपैकी काही आमदार निवडून पवारांनी शॅडो कॅबिनेट स्थापन केले. त्या शॅडो कॅबिनेट मंत्र्यांना फडणवीस कॅबिनेट मधल्या मंत्र्यांच्या १०० दिवसांच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायला सांगितले, पण आता त्याला महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी देखील पवारांच्या शॅडो कॅबिनेट मधले आहेत कुठे??, हा सवाल , समोर आला. पवारांनी नेमलेल्या शॅडो कॅबिनेट मध्ये त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा समावेश केला. पण हेच हर्षवर्धन पाटील शॅडो कॅबिनेट मधले आपले मंत्रिपद सोडून नीरा नरसिंगपूरच्या लक्ष्मी नरसिंह देवस्थानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करायला हजर राहिले.
पवारांच्या शॅडो कॅबिनेट मधले प्रमुख मंत्री जयंत पाटील हे अजूनही तळ्यात मळ्यातच राहिलेत. त्यांना पवारांच्या कॅबिनेटच्या शॅडो मधून बाहेर पडून खऱ्या कॅबिनेटमध्ये जायचंय. पण वाट सापडत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांना रोज उभे आडवे ठोकून काढत आहेत. जयप्रकाश दांडेगावकर, रोहित पाटील, रोहित पवार हे बाकीचे शॅडो कॅबिनेट मधले मंत्री कुठे आहेत??, हा सवाल पुढे आल्यावर रोहित पवार हे शॅडो महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात गुंतल्याचे समोर आले, पण त्यांच्या शॅडो महाराष्ट्र केसरीच्या “सफल” आयोजनाच्या बातम्या मराठी माध्यमांनी फारशा दिल्याच नाहीत. कारण त्यांनी आयोजित केलेल्या शॅडो महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मूळ राष्ट्रीय कुस्ती संघटनेची अधिमान्यताच नव्हती.
पवारांनी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटची अशी महिनाभरातच वासलात लागल्यानंतर आता मनसे मुंबई प्रति महापालिका उभारू पाहत आहे. त्यांना वेगवेगळ्या एनजीओ आणि काही प्रमाणात नागरिक प्रतिसाद देत असल्याचे बोललेही जात आहे. आता या प्रतिसादाला मनसेचे नेते आणि कार्यकर्ते कशा प्रतिसाद देणार आणि मनसे मुंबईतली प्रति महापालिका कशी उभी करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MNS now contemplates shadow municipal corporation, but what happened to pawar shadow cabinet??
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या तयारीत!
- आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात, ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचा इशारा!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 17 नक्षली ठार; यात 11 महिला, कुख्यात कमांडरही मारला गेला
- Myanmar : म्यानमारमध्ये २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले